गुगल मॅप सेवा आता मराठीत

 गुगल मॅप सेवा आता मराठीतनेव्हिगेशनसाठी बहुतांश युजर्स गुगल मॅपचा  वापर करतात.आता कंपनीने युजर्सच्या आवश्यकतेनुसार यामध्ये काही बदल करण्याची घोषणा केली आहे. यानुसार आता ही सेवा मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे. जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, त्यामुळे भारतीय नेटकऱ्यांच्या गरजांकडेही विशेष लक्ष दिलं जातं.कंपनीने गुगल मॅप्समध्ये 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन  सिस्टिम सुरू करण्याची घोषणा केली आहे. एका ब्लॉग पोस्टद्वारे गुगलने 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. गुगल मॅपची सेवा आता मराठीसोबतच हिंदी, गुजराती, बंगाली, मल्ल्याळी, कानडी, पंजाबी, उडिया, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही वापरता येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post