मोदींविरोधात व्टिट, गो एअरच्या पायलटची कामावरुन हकालपट्टी

 

मोदींविरोधात व्टिट, गो एअरच्या पायलटची कामावरुन हकालपट्टीनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं तात्काळ पायलटला कामावरून काढून टाकले. पंतप्रधानांविषयी अवमानकारक विधान केल्याप्रकरणी पायलटला तात्काळ कामावरून निलंबित केलं असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती.

मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी संताप व्यक्त केला. वाद निर्माण झाल्यानं मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post