सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या स्वतःबरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या - योगिता राणे

 सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या स्वतःबरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या - योगिता राणेशेवगाव  -  साखर | कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून रस्त्यावर ऊस वाहतुक करणारे ट्रक ट्रॅक्टर व टायरगाडी रहदारी वाढल्यामुळे रस्ता अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. 32 वा सडक सुरक्षा सप्ताह निमीत्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय , अहमदनगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली  परिवहन निरीक्षक योगीता राणे व चालक डि.टी. गीते यांनी

शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील गंगामाई, केदारेश्वर व वृधेश्वर साखर कारखान्यावर  सडक सुरक्षा सप्ताह निमीत्त प्रत्यक्ष भेट देवून वाहन चालकांना रस्ता सुरक्षे बाबत मागदर्शन केले.  ऊस वाहतुक करणारे ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी चालक यांची सभा घेवून वाहन चालकाने वाहन चालवतांना घ्यावयाची खबरदारी,  नशा करून वाहन न चालवणे, ट्रॅक्टरवर साऊंड सिस्टीम न लावणे, वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहतूक करू नये, तसेच प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर लावणे जेणे करून रात्रीचे वेळेस मोटारसायकल व इतर वाहने येवून अपघात होणार नाही याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

ज्या ट्रक ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावलेले नाहीत त्यांना रिफ्लेक्टर चिकटवून कारखान्यातील संबंधीत अधिकारी कर्मचारी यांना सर्व ऊस वाहतूकीचे वाहनांना रिफ्लेक्टर चिकटवणे बाबत सुचना केल्या.

गंगामाई साखर कारखान्यावर प्रत्यक्ष भेट देवून वाहनांची पाहणी केली असता कारखान्याने सडक सुरक्षेकरीता केलेली कार्यवाही व घेत असलेल्या खबरदारी बाबत परिवहन निरीक्षक योगीता राणे यांनी समाधान व्यक्त केले.  या प्रसंगी व्हाईस प्रेसिडेन्ट व्हि. एस. खेडेकर यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. केदारेश्वर काररवान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक गर्जे व वृध्देश्वर कारखान्याचे शेतकी अधिकारी ढमाळ तसेच सर्वच साखर कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्या बदद्ल शासनाचे वतीने धन्यावाद व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post