करोनाची लस मोफत कि शुल्क आकारुन? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

देशवासियांना कोरोनाची लस मोफतच, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणानवी दिल्ली : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. यातच एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्यांना दिल्लीप्रमाणं देशातील सर्व राज्यात कोरोना लस मोफत देणार का? असा सवाल केला असता डॉ हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लस दिल्लीतच नाही तर सर्व देशात मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जाणार नाही.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post