पब्जीला पर्याय ठरणारा ‘फौजी’ गेमची प्रतिक्षा संपली
नवी दिल्ली : पब्जी या तुफान लोकप्रिय झालेल्या गेमचं देसी व्हर्जन फौजी बाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. फौजी या गेमचं लाँचिंग याच महिन्यात होणार असल्याने लाखो मोबाईल गेम चाहत्यांच्या आनंदाला उधाण येणार आहे. रॉयल बॅटल गेम अॅप या गेमिंग अॅप विकसक कंपनीने फौजी (FAU-G) ही गेम २६ जानेवारीला भारतात लाँच करणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे पब्जी मोबाईल इंडियाने गेम लाँचिंगबाबत अजूनही अनिश्चितता दर्शविली आहे. चार महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने फौजी ही गेम भारतात लाँच करण्याबाबतची माहिती उघड केली होती.
Post a Comment