रान एरंडाच्या बिया खाल्ल्याने 18 मुलांना विषबाधा
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलापूर तालुक्यात कुंभी वाघोली गावात काजू समजून चंद्रज्योतीच्या (रान एरंड) बिया खाल्ल्यामुळे 18 मुलांची प्रकृती बिघडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खेळत असताना मुलांना चंद्रज्योतीच्या झाडाखाली बिया दिसल्या. काजू समजून मुलांनी त्या बिया खाल्ल्या. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागला. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. रस्ताच्या कडेला झुडुपांसारख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या वनस्पतीची फळं आकर्षक असल्याने लक्ष वेधून घेतात. परंतु चंद्रज्योतीचे फळ किंवा बिया खाल्ल्याने लहान मुलांना विषबाधा होत असल्याचे दिसून आले आहे. काजुच्या बिया समजून लहान मुलं या बिया फोडून खात असल्याचं बर्याचदा पाहायला मिळालं आहे.
Post a Comment