महापालिकेला कार्यक्षम आयुक्तांची नेमणूक करावी

 माजी सभापती संजय गाडे यांची मागणी : नगरविकास मंत्र्यांना दिले निवेदन

महापालिकेला कार्यक्षम आयुक्तांची नेमणूक करावी
अहमदनगर : महापालिकेच्या स्थापनेपासुन महापालिकेला आत्तापर्यत कार्यक्षम आयुक्त न मिळाल्याने नगर शहराची वाताहात झाली आहे . नियोजनबद्ध विकासाचे व्हिजन असणारा सक्षम आयुक्त नगर शहराला मिळाले तर नगरचा चेहरा बदलण्यास वेळ लागणार नाही त्यासाठी कार्यक्षम आयुक्त नियुक्त करावा अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे .
गाडे यांनी आपल्या मागणीचे निवेदन मंत्री शिंदे व तनपुरे यांना दिले असुन त्यात म्हटले आहे की , सन २००३ मध्ये नगरला महापालिकेची स्थापना झाली . तेव्हापासुन आजपर्यंत महापालिकेला कार्यक्षम आयुक्त मिळाले नाही . सेवानिवृत्ती जवळ आलेल्या अधिकाऱ्यानाच नगरला आयुक्त म्हणुन नियुक्त केले जाते . निवृत्ती जवळ आल्याने आयुक्त सक्षमपणे आपल्या पदाला न्याय देत नाहीत .
यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण राहत नाही . तसेच शहाराच्या विकासाच्या दृष्टीने मोठे प्रकल्प व योजना नगरला येऊ शकल्या नाहीत . नियोजनबद्ध विकासाची दृष्टी असणारा कार्यक्षम अधिकारी नगरला आयुक्त म्हणुन नियुक्त करावा अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post