8 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात करोना लसीकरणाचा ड्राय रन
मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. ब्रिटन स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळले असून ते विलगीकरणात आहेत. ते ज्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेतो आहे. तसेच नवी नियमावली आम्ही खूप काटेकोर राबवत आहोत. आठ रुग्ण आढळल्याने लोकांनी काळजी घेतली पाहिजे, घाबरू नका. या नव्या स्ट्रेनचा वेगाने प्रसार होतो, त्यामुळे सजग राहिले पाहिजे. असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
’नियम जनहितासाठी करतो ते सगळ्यांनी पाळले पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कायदा सगळ्यांनी पाळला पाहिजे. 7 जानेवारी रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांबरोबर व्हीसीद्वारे बैठक आहे. 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन होईल. काही त्रुटी आहेत का हे तपासण्यासाठी हा ड्राय रन होईल. आरोग्य कर्मचार्यांमध्ये समन्वय आहे का, इंटरनेटची अडचण आहे का हे तपासले जाईल.’ असं ही टोपे यांनी म्हटलं आहे.
Post a Comment