ज्ञानेश्वर कारखान्यावरील घुले बंधूंचे वर्चस्व कायम, संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध

 ज्ञानेश्वर कारखान्यावरील घुले बंधूंचे वर्चस्व कायम, संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध



नेवासा: भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध अखेर बिनविरोध झाली आहे. माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह 114 उमेदवारांनी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी आपले अर्ज माघारी घेतले. माजी आमदार नरेंद्र घुले तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून कारखान्यावरील घुले बंधूंचे वर्चस्व कायम राहिले आहे.  संचालक मंडळाच्या 21  जागांसाठी 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.  छाननीत 135 अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 114 उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडून आलेले संचालक : शेवगाव गट- सुधाकर नरवडे, पंडित भोसले. शहरटाळकी गट- नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले. नेवासा गट- विठ्ठलराव लंघे, काकासाहेब शिंदे, गोरक्ष गंडाळ. ढोरजळगाव गट- मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे. कुकाणा गट- पांडुरंग अभंग, नारायण म्हस्के. वडाळा गट- भाऊसाहेब कांगुणे, जनार्दन कदम, शिवाजी कोलते. अनु. जाती/जमाती मतदारसंघातून दीपक नन्नवरे. महिला प्रतिनिधी ताराबाई जगदाळे, रत्नमाला नवले. भटके-विमुक्त मतदारसंघातून- लताबाई मिसाळ. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक- पणन संस्था मतदारसंघ- देसाई देशमुख. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ-शंकर पावसे


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post