आणखी व्टिस्ट, धनंजय मुंडेंच्या मेहुण्याचीही ‘त्या’ महिलेविरोधात तक्रार

 आणखी व्टिस्ट, धनंजय मुंडेंच्या मेहुण्याचीही ‘त्या’ महिलेविरोधात तक्रारमुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या महिलेच्या विरोधात भाजप व मनसे पदाधिकार्‍यानी तक्रार दाखल केल्यानंतर आता आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी नोव्हेंबरमध्येच ही तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. रेणु शर्मा 2019 पासून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं केंद्रे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. ब्लॅकमेल करणे, त्रास देणे अशा प्रकारचा त्रास रेणू शर्मा यांच्याकडून दिला जात होता, असं केंद्रे यांनी अपल्या तक्रारीत म्हटलं आहे. मुंडे यांच्या मेहुण्यानेच आता संबंधित महिलेविरुध्द तक्रार दाखल केल्याने मुंडे प्रकरणातील व्टिस्ट आणखी वाढला आहे. तक्रारींचा सपाटा सुरु झाल्याने स्वत: शर्माच आता अडचणीत आल्याचीही चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post