देवगावमध्ये दोन उमेदवार बिनविरोध

देवगावमध्ये दोन उमेदवार बिनविरोध 
अहमदनगर : नगर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सदगुरु पॅनलच्या  वॉर्ड क्र. १ मधील उमेदवार राणी रमेश शिंदे व आशा अर्जुन शिंदे बिनविरोध निवडून आल्या आहेत. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांमुळे देवगाव ग्रामस्थांचा विश्वास संपादन केल्याने दोन उमेदवार बिनविरोध झाले असून पॅनलचे अन्य उमेदवार देखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास विलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post