ग्रामपंचायत निवडणुका दारुमुक्त कराव्यात, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मागणी

ग्रामपंचायत निवडणुका दारुमुक्त कराव्यात, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मागणीनगर : गावोगावी ग्रामपंचायत निवडणुका होत असून दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क तसेच गावपुढाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दारूबंदी आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.लग्नातील वराती आणि निवडणुका हे तरुण मुलांना दारू पाजण्याचे प्रशिक्षण केंद्र झाले आहे.निवडणुका आठवड्यात संपून जातील; पण व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील. त्यामुळे गावातील जाणत्या लोकांनी गांभीर्य ठेवून दारू वाटणाऱ्या, मुलांना हॉटेलमध्ये नेणाऱ्या उमेदवारांना समज द्यावी व गावातील मतदारांनी असे उमेदवार पराभूत करावेत, तसेच अशा उमेदवारांच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनीही दारू वाहतूक, वेळ संपल्यावर रात्री हॉटेल उघडी राहणे व अवैध दारूची विक्री याबाबत लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनाचे कार्यकर्ते अशोक सब्बन, हेरंब कुलकर्णी, रंजना गवांदे, भाऊसाहेब येवले, संतोष मुतडक, अमोल घोलप, कारभारी गरड, बाळासाहेब मालुजकर, संदीप दराडे, मारुती शेळके, जालिंदर बोडके आदींनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post