"या' जुन्या नोटा मार्च मार्च एप्रिलनंतर चलनातून काढून घेणार, रिझर्व्ह बँकेची माहिती

 

100, 10 व 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होणार



मुंबई : सध्या भारतीय चलनात असलेल्या 100, 10, 5 रुपयांच्या जुन्या नोटा मार्च एप्रिलनंतर चलनातून काढून घेण्यात येणार आहे. संदर्भात रिझर्व्ह बँकेकडून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली आहे. या जुन्या नोटा मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआय मार्च-एप्रिलपर्यंत चलनातील जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडतील. वास्तविक, 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याच्या अगोदरच याच्या नवीन नोटा यापूर्वीच चलनात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. 500 व 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा अनुभव लक्षात घेवून प्रथम नवीन नोट बाजारात चलनमध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे आरबीआयचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post