कॉंग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार?
नवी दिल्ली: महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्रीपद सांभाळणारे बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाल्याने त्यांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. बाळासाहेब थोरात रविवारपासून दिल्लीत असून त्यांनी कॉंग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी कॉंग्रेस नेते राजीव सातव यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद असल्याने त्यांना पक्षासाठी हवा तसा वेळ देणं जमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात येणार असून राज्याला नवा प्रदेशाध्यक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी थोरात यांच्याशी चर्चा करण्याकरिता त्यांना दिल्लीत बोलावलं गेल्याची चर्चा आहे. काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
Post a Comment