‘चला हवा येवू द्या’मध्ये प्रजासत्ताक दिन विशेष...दिग्गज सेलिब्रिटी अवतरणार
‘चला हवा येऊ द्या’मध्ये येता आठवडा प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी असे दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. यावेळी मंचावर हे विविध क्षेत्रातील दिग्गज आपले अनुभव व्यक्त करताना दिसतील.यावेळी ‘हवा येऊ द्या’च्या मंचावर न्यायालय अवतरणार आहे. यात कोणावर कोणते आरोप होणार आणि त्यातून काय धमाल येणार यासाठी सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत.
Post a Comment