जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा प्रभारी कारभार विभागीय उपायुक्त पाहणार

जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा प्रभारी कारभार विभागीय उपायुक्त डी.डी.शिंदे यांच्याकडेनगर : अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय उपायुक्त (आस्थापना) डी.डी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.  मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या वाहनाला १९ जानेवारी रोजी अपघात झाल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी सीईओपदाचा प्रभारी कार्यभार उपायुक्त डी.डी शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post