बुऱ्हानगर प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी कर्डिलेंनी स्वतःच्या शेतीसाठी वापरले प्रा-शशिकांत गाडे

 बुऱ्हानगर प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी कर्डिलेंनी स्वतःच्या शेतीसाठी वापरले प्रा.शशिकांत गाडेअहमदनगर : - बुऱ्हानगर येथे येणारे प्रादेशीक पाणी योजनेचे  पाणी मा. आ. शिवाजी कर्डीले स्वतःच्या शेतीसाठी वापरत असल्यामुळे येथील नागरिकाना पंधरा दिवसातून एकदा पाणी मिळते . यामुळे पाण्यासाठी नागरिंकाना भटकंती करण्याची वेळ आली आहे . ग्रामपंचायत निवडणुका संपल्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे याच्या माध्यमातून मा. आ. नी ग्रामस्थाचे हक्काचे पळवलेले पाणी बंद करून नागरिकाना पुरेसा पाणी पुरवठा करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शाशिकांत गाडे यानी यावेळी सांगीतले .

बु्ऱ्हानगर येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शंभारभ प्रसंगी ते बोलत होते. राहुरीच्या माजी नगरध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी नगर ध्यक्ष  अनिता पोपळघट,माजी महापौर भगवान फुलसौंदर , आप्पासाहेब कर्डीले, दिलीप सातपुते , बाळासाहेब बोराटे , सचिन शिंदे, अमोल येवले , संग्राम शेळके , सागर गायकवाड , विशाल वालकर , अमोल जाधव , रोहिदास कर्डीले, देविदास कर्डीले उपस्थित होते . यावेळी गाडे म्हणाले तीस वर्षानंतर बुऱ्हानगर येथे ग्रामपंचायतीची निवडणुक लागली आहे . लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुक महत्वाची असते . मात्र बु्ऱ्हानगर येथील लोकप्रतिनिधीला हे मान्य नाही . निवडणुक निर्णय अधिका यावर दबाव टाकून रोहीदास कर्डीले व त्याच्या पत्नी असा दोघाचे अर्ज बाद करण्यास भाग पाडले . मात्र न्यायालयात आ पील केल्यामुळे दोद्याचे अर्ज वैद करण्यात आले .बुन्हानगर येथे महावीकास आघाडी आठ उमेदवार रिंगणात उतरवले आहे . ते विजयी होणार आहे . या गावात हुकुमशाही पध्दतीने राजकारण चालते . ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले उमेदवार हे नामधारी आहे . स्वतःच्या मर्जातील उमेदवार दिले जाण्याची परंपरा आहे . ग्रामपंचायत ला येणारा निधी स्वतः साठी वापरत आहे . जिल्हा बैकेच्या माध्यमातून वाटप  केलेले कर्ज चौदा तारखेच्या माफ करावे मगच शेतक -या ना मतदान मागावे . बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी  व जिल्हा बॅकेचे संचालकपद पदरात पाडून घेण्यासाठी खेळते भांडवलाचे आमिष  मा. आ. कर्डोले यांनी दाखले. विधानसभेत महाआघाडीने जागा दाखवली आता  ग्रामपंचायती च्या निवडणुकीत ५६पैकी ५० ग्रामपंचायती ताब्यात घेणार असल्याचे गाडे यावेळी म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post