महत्वाची बातमी...३० जानेवारीला संपूर्ण देशभरात २ मिनिटांचे 'मौन'


महात्मा गांधी पुण्यतिथीला देशभरात २ मिनिटे मौन नवी दिल्ली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारीला पुण्यतिथी असून‌ केंद्र सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. हा दिवस नेहमीप्रमाणे शहीद दिवसाच्या रुपात साजरा केला जाईल. सोबतच सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्मरणार्थ मौन ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय, यादरम्यान काम आणि हालचालींवरही निर्बंध असतील

शहीद दिवसासाठी जे आदेश गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत त्यानुसार, 30 जानेवारीला प्रत्येक वर्षी सकाळी 11 वाजता दोन मिनिटांचं मौन ठेवलं जाईल. त्यासोबतच संपूर्ण देशात त्या दोन मिनिटांसाठी कुठलंही काम किंवा हालचाल होणार नाही. ज्या ठिकाणी सायरनची व्यवस्था असेल त्या ठिकाणी सायरन वाजवून मौनबाबत आठवण करुन दिली जाईल. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post