डॉक्टरचा बंगला फोडून चोरट्यांनी लांबवला ऐवज, परकीय डॉलरही लंपास

 


डॉक्टरचा बंगला फोडून चोरट्यांनी लांबवला ऐवज, परकीय डॉलरही लंपासनगर : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे डॉ.ज्ञानेश्वर अंबादास दहिफळे यांच्या मध्यवस्तीतील तीन मजली बंगल्याचा लोखंडी दरवाजा तोडून चोरट्यांनी  परकीय 500 डॉलरसह रोख 80 हजार रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान घडली असून चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. डॉ.दहिफळे हे पत्नीसह दहा दिवसांपासून येथे गेलेले होते. येथील बंगल्यात कंपाउंडर बाजीराव पातकळ हा एकटाच राहत असे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचा पाठीमागील लोखंडी शटर व चॅनेल गेटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील साहित्याची उचकापाचक करून चोरट्यांनी त्यातील  सोन्याच्या अंगठ्या, गंठण, चैन असे अंदाजे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, बॅगेतील परकीय चलन तसेच रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post