बुर्‍हाणनगरमध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंच्या पॅनलचा दणदणीत विजय

बुर्‍हाणनगरमध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंच्या पॅनलचा दणदणीत विजयनगर : नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील ग्रामविकास पॅनलनेच बाजी मारली आहे. 15 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्यानंतर विरोधकांनी उर्वरित 7 जागांसाठी उमेदवार दिल्याने बुर्‍हाणनगरला अनेक वर्षांनी प्रथमच निवडणूक झाली. प्रचारादरम्यान विरोधकांनी कर्डिले यांच्या कार्यपध्दतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र मतदारांनी कर्डिले यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त करीत सर्व सातही जागांवर ग्रामविकास पॅनलला विजयी केले. त्यामुळे बुर्‍हाणनगरवरील कर्डिले यांची एकहाती सत्ता कायम राहिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post