'डान्सिंग क्वीन' उपविजेत्या स्नेहा देशमुख यांचा जय आनंद मंडळातर्फे हृदय सन्मान

 स्नेहा देशमुख यांची अभिमानास्पद कामगिरी नगरमधील नवोदित कलाकारांना प्रेरणा देईल: स्वाती चंगेडीया

डान्सिंग क्वीन उपविजेत्या स्नेहा देशमुख यांचा जय आनंद मंडळातर्फे हृदय सन्माननगर : तुमच्यात कलागुण असतील व योग्य व्यासपीठ मिळाले तर तुमचं कर्तृत्व झळाळून निघते. नगर शहराला अशा गुणी कलाकारांची मोठी परंपरा आहे. आता स्नेहा देशमुख यांच्या रूपाने पुन्हा एकदा नगरचे नाव उंचावले आहे.  अभिमानास्पद कामगिरी करताना त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. नगरमधील नवोदित कलाकारांना त्या मार्गदर्शन करून प्रेरणा देतील असा विश्वास जय आनंद महावीर महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती चंगेडीया यांनी व्यक्त केला.
झी वाहिनीवरील डान्सिंग क्वीन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणार्या नगरच्या स्नेहा देशमुख यांचा जय आनंद मंडळातर्फे विशेष सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चंगेडिया यांनी देशमुख यांच्या अभिमानास्पद कामगिरीचा गौरव केला.  यावेळी स्नेहा देशमुख यांच्या आई व  लयशाला नृत्य अकादमीच्या संचालिका मंजुषा देशमुख, भारती गुंदेचा, संध्या मुथा, स्वाती गांधी, सुरेखा बोरा, गुंजन भंडारी, सत्येन मुथा, मनोज गुंदेचा उपस्थित होते.
स्नेहा देशमुख म्हणाल्या की, एका मोठ्या व्यासपीठावर नृत्य कला सादर करताना खूप मोठा अनुभव मिळतो. झी वरील ही स्पर्धा खुप अनुभव देणारी ठरली. यानंतर आज नगरमध्ये झालेला घरचा सन्मान खूप प्रेरणा देणारा आहे.जय आनंद मंडळ नेहमीच गुणी लोकांना प्रोत्साहन देण्यात अग्रेसर असतं. नगरकरांकडुन मिळालेलं प्रेम व आपुलकी पाहून आणखी मोठी भरारी घेण्याची जिद्द निर्माण होते असं सांगून देशमुख यांनी स्पर्धे दरम्यानचे अनुभव कथन केले.
शेवटी संध्या मुथा यांनी आभार मानले. स्नेहा देशमुख यांना येत्या काळात नृत्य व अभिनयात भरारी घ्यायची असून यासाठी त्यांना मंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post