शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द

 शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द


नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींचा रोष ओढवून घेणारा नगरमधील नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचं नगरसेवकपद रद्द झालं आहे. मनपातील नगरसेवकांनी केलेल्या ठरावाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली होती. त्याविरोधात छिंदम यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.‌ आज उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत छिंदम विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे


आता छिंदमच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये पोटनिवडणुक होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post