माजी मंत्री राम शिंदे यांना चौंडी गावात धक्का, राष्ट्रवादीने घडवले सत्तांतर

 माजी मंत्री राम शिंदे यांना चौंडी गावात धक्का, राष्ट्रवादीने घडवले सत्तांतरनगर : माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात भाजपच्या पॅनलचा मोठा पराभव झाला आहे. शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या चौंडीत यंदा आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जोर लावला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नऊ पैकी सात जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले. राम शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात असून स्वत:च्याच गावात त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. अनेक वर्षांपासून राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चौंडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोधही होत असे. यंदा विरोधकांनी पॅनल उभे केल्यावर आ.पवार यांनी ताकद दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post