झिंग झिंग झिंगाट... बर्ड फ्लु पासून वाचवण्यासाठी कोंबड्यांना चक्क देशी दारुची मात्रा

 बर्ड फ्लु पासून वाचवण्यासाठी कोंबड्यांना चक्क देशी दारुची मात्रा..करोनापासून बचाव करण्यासाठी जगभरात अनेकांनी विविध क्लुप्त्या वापरल्याच्या बातम्या सर्वांनीच वाचल्या ऐकल्या आहेत. कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या अशा गोष्टी आता बर्ड फ्लुसाठीही वापरल्या जात आहेत. ग्रामीण भागात सध्या बर्ड फ्लूचा धसका अनेकांनी घेतला आहे. विशेषत: ज्यांच्याकडे कोंबड्या आहेत, त्यांनी तर अधिकच काळजी घेण्यास सुरुवात केलीय. यातूनच काही मंडळी कोंबड्यांना पाण्यातून देशी दारुचा डोस देत असल्याची चर्चा आहे. पारावरील चर्चेत कोणीतरी कोंबड्यांना देशी दारुची मात्रा द्या, अशी पुडी सोडून देते आणि त्याचे अनुकरण करण्याची लाट येते. मध्यंतरी शहरी भागात भटक्या कुत्र्यांना घराच्या आसपास फिरकरण्यास मज्जाव करण्यासाठी लाल पाणी असलेल्या बाटल्या लावण्याचा ट्रेंड सुरु झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांच्या बाहेर अशा लाल पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या दिसून येतात. आता बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर असाच देशी इलाज शोधून काढताना देशी दारुच कोंबड्यांना देण्याचा प्रकार सुरु झाल्याने आरोग्य यंत्रणेनही डोक्याला हात मारुन घेतलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post