मोठी बातमी...धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे, रेणु शर्माने पोलिसांना दिले लेखी

मोठी बातमी...धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे, रेणु शर्माने पोलिसांना दिले लेखी

 


मुंबई :   राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय  मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post