कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी संध्या सवालाखे यांची नियुक्ती
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या सवालाखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव के.वेणुगोपाल यांनी सवालाखे यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे. या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सवालाखे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सवालाखे या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.
Post a Comment