मुंबई, दि.१५ : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक (सुमारे ६४ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात सायंकाळी ८ वाजेपर्यंत ८७१ जणांचं लसीकरण पूर्ण झाले आहे.
*एकूण: ८७१*
जिल्हा सामान्य रुग्णालय :९०
उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी:८६
उपजिल्हा रुग्णालय कर्जत :३६
शेवगाव ग्रामीण रुग्णालय :८०
श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय-:९९
राहाता ग्रामीण रुग्णालय: ४०
संगमनेर ग्रामीण रुग्णालय :१००
अकोले ग्रामीण रुग्णालय- ७८
तोफखाना नागरी आरोग्य केंद्र :६५
जिजामाता नागरी आरोग्य केंद्र :७७
केडगाव नागरी आरोग्य केंद्र -६९
नागापूर नागरी आरोग्य केंद्र ५०
Post a Comment