लावा मोबाईल्सनं भारताता Z सीरिजचे चार मेक इन इंडिया स्मार्टफोन्स लाँच
स्वदेशी कंपनी लावा मोबाईल्सनं भारताता Z सीरिजचे चार मेक इन इंडिया स्मार्टफोन्स लाँच केले आहे. तसंच या स्मार्टफोन्सची किंमत सामान्यांना परवडणारी असून यात अनेक फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीनं Lava Befit SmartBand देखील लाँच केला आहे.याव्यतिरिक्त विशेष बाब म्हणजे लावा Z सीरिजनं myZ मोबाईल्स कस्टमाईझ्ट करण्याचा ऑप्शनही दिला आहे. यानुसार ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार मोबाईचे फीचर्स आणि डिझाईन ठेवता येणार आहे.हे सर्व फोन मेड इन इंडिया असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे. कंपनीनं आणखी एक Lava Z6 हा मोबाईल लाँच केला आहे. यामध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आलं असून त्याची किंमत ९,९९९ रूपये इतकी आहे. या सर्व स्मार्टफोन्सची विक्री ११ जानेवारीपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सद्वारे केली जाणार आहे. तसंच Lava Z1 आणि Z Up या स्मार्टफोन्सची विक्री २६ जानेवारीपासून केली जाणार आहे.
Post a Comment