बासमतीचा राजा रियाज तांदळाला ग्राहकांची वाढती मागणी

 बासमतीचा राजा रियाज तांदळाला ग्राहकांची वाढती मागणीनगर : येथील दाळमंडईतील नामांकित माणिकचंद धनराज गुगळे (बारामतीकर) ही फर्म 61 वर्ष जुनी असून या फर्मव्दारे संपूर्ण नगर जिल्ह्यात अस्सल बासमती तांदळाचे वितरण केले जाते. हा बासमती तांदूळ पुलाव, बिर्याणी, जिरा राईस, प्लेन राईसासाठी वापरला जातो. यातील रियाज हा ब्रॅण्ड संपूर्ण देशात नावाजलेला असून बासमतीत शेला, स्टीम व रॉ बासमती हे तीन प्रकार येतात. या बासमती तांदळाला ग्राहकांची वाढती मागणी असून जिल्हाभरातील रिटेलर्सना याचे वितरण केले जाते, अशी माहिती साहिल गुगळे यांनी दिली.

रियाज हा 1121 बासमती शेला तांदूळ असून बिर्याणी, पुलाव, जिरा राईस, प्लेन राईससाठी सर्वोत्कृष्ट आहे. लग्नसमारंभ, पार्टी तसेच वेगवेगळे भोजन समारंभात भोजनाचा आस्वाद वाढविण्यासाठी रियाज बासमतीलाच पसंती दिली जाते. याशिवाय हॉटेल उद्योगातूही रियाजला मोठी मागणी असते. या तांदळाचे वैशिष्ट्‌ये म्हणजे तो अतिशय मुलायम, लांब व मोकळा असतो आणि शिजवल्यानंतर अतिशय चविष्ट लागतो. याच कंपनीचा झिनत हा 1121 स्टिम असलेला तांदूळ मऊ, मोकळा, लांब व चवदार होतो. हा तांदूळ प्लेन राईस, जिरा राईससाठी खूप प्रसिध्द आहे. यामुळे लोकांकडून आवर्जून या तांदळाची मागणी होते. सजदा 1121 बासमती साईजर तांदूळ शिजवल्यावर पातळ, लांब व मोकळा होतो. हा तांदूळही बिर्याणी, पुलाव, जिरा राईस, प्लेन राईससाठी आवर्जून वापरला जातो. अतिशय छान चव असल्याने जेवणाचा स्वाद वाढतो. त्याचप्रमाणे एक्झॉटिक 1121 हा शेला बासमती तांदूळ शिजवल्यावर केशरच्या काडीप्रमाणे बारीक व लांब होतो. हा तांदूळ खाण्यासाठी खूप मुलायम असल्याने त्यापासून पुलाव, बिर्याणी, जिरा राईस, प्लेन राईस केला जातो. मिल्की क्रीम हा 1121 बासमी शेलाचा इकॉनॉमी असलेला तांदूळ चायनीज पुलाव, फ्राईड राईस, बिर्याणीसाठी वापरला जातो. हा तांदूळ लांब व मोकळा बनत असल्याने याला मागणीही खूप असते.

अस्सल स्वादाचा हा बासमती तांदूळ दिल्लीतील आर.एस.ऍग्रो प्रा.लि.या कंपनीचे उत्पादन असून दर्जेदारपणा व वाजवी दरासाठी नावाजले जातात. मागील वीस वर्षांपासून नगर जिल्ह्यात या तांदळाचे वितरण या फर्ममार्फत केले जाते. नगर शहर व जिल्ह्यातील नामांकित किराणा दुकानात हा तांदूळ उपलब्ध आहे. ग्राहकांनी बासमतीच्या नावाखाली तुलनेने कमी दरात मिळणार्‍या मिक्सिंग केलेल्या मालापासून सावध रहावे. थोडी सावधनता बाळगून ओरिजिनल आर.एस.ऍग्रोच्याच बासमती तांदुळाची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post