कुख्यात आरोपी येरवडा जेलमधून पळाला, कर्जत पोलिसांनी शिताफीने पकडला

कुख्यात आरोपी येरवडा जेलमधून पळाला, कर्जत पोलिसांनी शिताफीने पकडला नगर (विक्रम बनकर) : येरवडा कारागृह येथून जेलचे गज कापून फरार झालेला आरोपी जेरबंद करण्यात कर्जतच्या पोलीस उपाधीक्षकांना यश आले आहे.

        कर्जतचे पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना दि.६रोजी रात्री गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, येरवडा कारागृहातुन गज कापुन फरार झालेला आरोपी अनिल विठ्ठल वेताळ (वय २२रा.शिरूर जि. पुणे) हा कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात येणार असल्याची माहिती मिळाली सदर माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आपल्या कार्यालयीन पथकास योग्य सुचना देऊन राक्षसवाडी शिवारात माळरानावर रात्री दोनच्या सुमारास सापळा रचून आरोपी वेताळ यास ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याच्या विरुद्ध पुणे जिल्ह्यात दरोडा,जबरी चोरी,असे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत असून येरवडा कारागृहातून गज कापून पळाल्याने येरवडा पोलीस ठाण्यात कलम २२४प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव,सफौ.गौतम फुंदे,पोना.केशव व्हरकटे,अप्पासाहेब कोळेकर,पोकॉ. हृदय घोडके,इरफान शेख,सागर जंगम,आदित्य बेल्हेकर, दादाराम म्हस्के,संतोष साबळे,मच्छिंद्र जाधव आदींनी केली आहे.    

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post