त्या प्रकरणातून शांती मिळताच मंत्री धनंजय मुंडे शनिदरबारात

  प्रकरणातून शांती मिळताच मंत्री धनंजय मुंडे शनिदरबारात , केला शांती अभिषेक 




सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज शनिशिंगणापुरला भेट देवून शनिग्रह शांती आणि तेल अभिषेक करुन स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले . गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यावर राजकीय कारणातून चिखलफेक झाली . आता काही अंशी अडचण दूर झाली आहे . आता त्यांनी शनिदरबारात येऊन अभिषेक केला .


रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर आरोप केले होते . त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येते की काय , अशी स्थिती निर्माण झाली होती . शर्मा यांनी हे आरोप घेतल्यानंतर वातावरण शांत झाले . या सर्व घडामोडींत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखण केली . हे सर्व प्रकरण शांत झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे . वंजारवाडी ( ता . नेवासा ) येथील संत वामनभाऊ सप्ताह सोहळ्यातील पुरस्कार वितरण कार्यक्रमास जाताना त्यांनी शनिशिंगणापुरला भेट दिली . त्यांनी उदासी महाराज मठात अभिषेक करुन दर्शन घेतले . या वेळी पद्मश्री डॉ . तात्याराव लहाने व प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते . आज दुपारी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दर्शनाचा लाभ घेतला . देवस्थान ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयात युवानेते उदयन गडाख यांनी त्यांचा शाल , श्रीफळ तसेच प्रसाद देवून सन्मान केला . या वेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर , उपाध्यक्ष विकास बानकर , चिटणीस अप्पासाहेब शेटे , माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे उपस्थित होते . येथील दर्शनाने आत्मिक समाधान लाभले असून , मनाला उर्जा प्राप्त झाली आहे , असे मुंडे यांनी सांगितले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post