संसदेतील कॅन्टीनच्या जेवणावरील अनुदान बंद... वर्षाला ८ कोटी वाचणार

 

संसदेतील कॅन्टीनच्या जेवणावरील अनुदान बंद... वर्षाला ८ कोटी वाचणारनवी दिल्ली : खासदारांना यापुढे संसद भवन संकुलाच्या कॅन्टीनमध्ये अनुदानित जेवण मिळणार नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ओम बिर्ला यांनी म्हटलं की, खासदारांना आणि इतरांना संसदेतील कॅन्टीनच्या जेवणावर दिले जाणारं अनुदान बंद करण्यात आलं आहे.आयटीडीसी (भारतीय पर्यटन विकास महामंडळ) आता संसदेची कॅन्टीन चालवणार आहे. याआधी ही जबाबदारी उत्तर रेल्वेकडे होती. याआधी संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणांची प्लेट अवघ्या 35 रुपयांना मिळत होती. अनुदान रद्द केल्याने लोकसभा सचिवालयाची दरवर्षी 8 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post