आदिवासींच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक दिनी ढोल ताशासह हलगी आंदोलन, लहूजी शक्ती सेनेचा इशारा
नगर : आदिवासींच्या न्याय हक्कासाठी श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर दि,२६ रोजी ढोल ताशा आणि हालगी आंदोलन करण्याचा इशारा लहूजी शक्ती सेनेने दिला आहे. याबाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
लहुजी शक्ती सेनाचे जिल्हा महासचिव संतोष शिंदे, युवा जिल्हा अध्यक्ष उत्तम रोकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे, तालुका सचिव वसंत अवचिते, सागर गायकवाड, सोमनाथ जाधव, संतोष बर्डे आदींनी हे निवेदन दिले.
आंदोलनाच्या आंदोलकांच्या मागण्या :
हिंगणी दुमाला (तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर )या ठिकाणी रहात असलेल्या आदिवासी 30 ते 40 कुटुंबांच्या घराच्या नोंदी ग्रामपंचायतनी तत्काल लावण्यात यावेत, त्याठिकाणी शबरी घरकुल घरकुल योजना राबविण्यात यावी, वस्ती गावापासून दूर असल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था व्हावी त्याचबरोबर त्यांना पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
Post a Comment