यंत्रतंत्राच्या जाहिराती दाखवू नका; उच्च न्यायालयाचे आदेश

  यंत्रतंत्राच्या जाहिराती दाखवू नका; उच्च न्यायालयाचे आदेश औरंगाबाद - देवदेवतांच्या नावाचा सर्रास वापर करून सर्वसामान्यांच्या गळ्यात यंत्र तंत्र मारणाऱया व्यावसायिकांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. लोकांच्या श्रद्धेचे बाजारीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रात यापुढे टीव्ही चॅनल्सवर देवदेवतांच्या, यंत्रतंत्राच्या जाहिराती दाखवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.

विविध चॅनल्सवर पुन्हा अशा जाहिराती झळकू नयेत यासाठी मुंबईत विशेष कक्ष (सेल)स्थापन करून अघोरी कृत्य आणि काळी जादू कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना खंडपीठाने दिल्या आहेत.

काही विशेष चॅनल्सवर धर्माच्या नावाखाली हनुमान चालिसा, देवीचे यंत्र यासारख्या वस्तूंच्या जाहिराती दाखवल्या जातात. यामुळे महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट होत आहे.राज्य शासनाच्या 2013 मधील अघोरी कृत्य आणि काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर अशा जाहिरातींवरील प्रक्षेपणावर बंदी असतानाही या जाहिराती दाखवण्यात येत असल्याने औरंगाबाद येथील राजेंद्र अंभोरे या शिक्षकाने 2015 साली हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी कोर्टाला युक्तिवाद करताना सांगितले की अंधश्रद्धा व भोंदूगिरीला वेसण घालण्यासाठी तसेच समाज प्रबोधन होण्यासाठी विज्ञानाप्रती ओढ निर्माण व्हावी,यासाठी कायदा करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post