भाजपकडून ‘आयाराम’ बेदखल?, निवडणुकांची जबाबदारी जुन्या निष्ठावंतांकडेच

 


भाजपकडून ‘आयाराम’ बेदखल?, निवडणुकांची जबाबदारी जुन्या निष्ठावंतांकडेचभारतीय जनता पक्षाने मागील काही वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नेत्यांची आयात करून त्यांना पक्षात स्थान दिले. विधानसभा निवडणुकीपूर्वी तर भाजपने मेगा भरतीच केली. यात कॉंग्रेसचे तत्कालिन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री व कॉंग्रेसच्या कोअर कमिटीत असलेले हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाले. परंतु, भाजपमध्ये या नेत्यांना तितका मानमरातब किंवा विश्वास मिळत नसल्याचे दिसून येतय. संघटनात्मक निर्णय प्रक्रिया व जबाबदार्‍यांचे वाटप करताना भाजपकडून जुन्या निष्ठावंतांनाच स्थान दिले जात आहे. त्यामुळे ही नवीन मंडळी केवळ आपापल्या मतदारसंघांपुरतीच सिमित ठेवली जात आहे की काय, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. आताही राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपने जिल्हानिहाय प्रभारी नियुक्त केले आहेत. यात अनेकांना आपल्या कार्यक्षेत्राबाहेर दुसर्‍या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्वांची यादी पाहिली तर त्यात पूर्वीपासून भाजपमध्ये असलेल्यांनाच स्थान देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेले बबनराव पाचपुते अशा अनेकांना निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपच्या या चाणक्य नितीची चर्चाही रंगू लागली आहे. आपापल्या पक्षात असताना या दिग्गजांनी मोठ्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. मात्र आता भाजपमध्ये मात्र त्यांच्यावर अविश्वासच दाखवला जात आहे की, काय अशी परिस्थिती आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post