नगरचा गौरव...निकिता पोटे ठरली ‘मिस इंडिया’

 मिस इंडिया’ म्हणून निकिता पोटे हीची निवड     नगर - येथील नामवंत माध्यम तज्ञ  ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.विजयकुमार पोटे यांची पुतणी तसेच मुंबई पोलिसमध्ये असणारे संजयकुमार पोटे यांची कन्या कल्याण येथील निकिता संजयकुमार पोटे यांची राष्ट्रीय स्तरावरील ‘मिस इंडिया’ म्हणून निवड झाली आहेनुकत्याच गोवा येथे मिस इंडिया ग्लोबल 2020 टॅलेंटिका या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने आयोजित स्पर्धेत निकिता हीने राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविलेआता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

     गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निकिताने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेअंतिम फेरीत ती पहिल्या पाच स्पर्धकांमधून प्रथम चमकलीआता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणार आहेयापूर्वी तिला इंडियाज् नेस्ट टॉप मॉडेल वेस्टर्न झोन-2019 (महाराष्ट्रम्हणूनही गौरविण्यात आलेगेल्या वर्षीच्या स्टिलीया इंडिया ती पश्चिम क्षेत्राची विजेती आहेनिकिता ही कल्याण येथे राहत असूनतिचे वडिल मुंबई येथील कांजुर मार्ग पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहेतनिकिता ही शिवाजीराव एस जोंधळे पॉलिटेक्निकमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेतिचे प्राथमिक  माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा विद्यालयकल्याण येथे झाले आहेतिचे आजोळ शेवगांवचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post