ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आ.निलेश लंके यांचं कौतुक
नगर : पारनेर मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करताना २२२ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध करण्यात आ.निलेश लंके यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कौतुक केले आहे. आज.लंके यांनी आज मुंबईत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन ग्रामपंचायत निवडणुकांची माहिती दिली तसेच मतदारसंघातील प्रश्नांची चर्चा केली.
Post a Comment