नगरमधील २ जैन मंदिरांचा कर कायमस्वरूपी माफ

 कापड बाजार व गुजरगल्ली येथील जैन मंदिराचा कर बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नाने कायम स्वरुपी माफ     नगर- येथील श्री जैनऋषभ संभवती संघाच्या  कापड बाजार व गुजरगल्ली येथील दोन्ही जैन मंदिरास एकूण कराची मनपाकडून जादा रक्कम आलेली होती. त्यांनी ती नियमाप्रमाणे भरली परंतु याबाबत अधिक चौकशी केली असता धार्मिक स्थळांबाबतच्या नियमानुसार ही रक्कम जादा होती. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत माहिती दिली असता, त्यांनी मनपाशी याबाबत पाठपुरावा करुन जादा आलेली रक्कम निदर्शनास आणून दिली. मनपाने याबाबत जादा आलेली  रक्कम  पुढील पाणीपट्टी व ड्रेनेज संकलित करात समायोजित करण्यात येईल, असे पत्र दिले.

     मनपाकडून जादा आलेल्या रक्कम कमी करण्यासाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचा कापड बाजार जैन मंदिरच्यावतीने अध्यक्ष सुभाष मुथा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी परेश लोखंडे, विशाल वालकर, ट्रस्टी मणिकांत भाटे, विनोदभाई शाह, दिनेशभाई गांधी, राजूभाई शाह, सीए राजूभाई शाह, डॉ.सागर पटवा, कमलेश गांधी, सागर शाह, उमेश गांधी, आकाश वखारीया, शेखर गांधी, बापूभाई गांधी, सुनिल पटवा, संदिप मुथा आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post