सहकुटुंब लग्नाला गेले आणि इकडे चोरट्यांनी डाव साधला

 


सहकुटुंब लग्नाला गेले आणि इकडे चोरट्यांनी डाव साधलानगर : शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील खरड कुटुंबियांना सहकुटुंब सहपरिवार लग्नाला जाणे चांगलेच भोवले आहे. हे कुटुंबिय घर बंद करून नेवासा तालुक्यात नातेवाईकाच्या लग्नाला गेले असताना इकडे चोरट्यांनी डाव साधत त्यांच्या घरातून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह तीन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. विजय शंकर खरड (रा.देवटाकळी) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की पत्नी व दोन मुलांसह शुक्रवारी नेवासे तालुक्यात नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी गेलो होतो. सायंकाळी घरी आलो तेव्हा घर उघडे होते. पोलिसांना तत्काळ माहिती दिली. चोरांनी कपाटातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, असा तीन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post