पेट्रोल, डिझेल दरवाढीचा उच्चांक, सर्वसामान्य हवालदिल

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा उच्चांक, सर्वसामान्य हवालदिल मुंबई :  पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील 25 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर, नव्वदीपार गेले आहेत. तर डिझेलच्या दरानं 80 चा टप्पा ओलांडला आहे. मागील 10 महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच प्रतिलीटर 14 रुपयांची वाढ झाली आहे. सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचं हे सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. महाराष्ट्र हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक महाग इंधनविक्री करणारं राज्य ठरत आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post