इंटरसिटी रेल्वेसाठी आ.संग्राम जगताप सरसावले

 शिर्डी - मुंबई व अहमदनगर - पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरु करा

आ. संग्राम जगताप यांची मागणी

रेल्वे सेवेमुळे मिळेल  शहर विकासाला चालनाअहमदनगर : शिर्डी - अहमदनगर - पुणे - मुंबई या रेल्वेसेवेमुळे शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांना मोठी सुविधा मिळत होती. दररोज १५०० ते २००० प्रवासी या रेल्वेद्वारे प्रवास करत होते. ही रेल्वे सेवा कोरोना टाळेबंदीमुळे बंद आहे. सदर रेल्वे सेवा पुन्हा चालू केल्यास प्रवाशांना तसेच साईभक्तांना मोठी सुविधा निर्माण होईल अशी मागणी आ संग्राम जगताप यांनी नगर स्टेशन प्रबंधक नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अहमदनगर ते पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे. खाजगी वाहने, बसेस याद्वारे दररोज नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदी हजारो प्रवासी प्रवास करतात. परीणामी रस्ते वाहतुकीवर ताण येतो, रहदारी खोळंबणे, अपघात आदी समस्या निर्माण होऊन वेळ, इंथन व पैशांचा अपव्यय होतो. हे सर्व टाळण्यासाठी अहमदनगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे. यामुळे हा प्रवास फक्त दोन तासांत होणार असल्याने नागरिकांची वेळेची व पैशांची बचत होऊन रेल्वे प्रशासनास देखील मोठ्या प्रमाण उत्पन्न मिळणार आहे. दळणवळणाचे परवडण्याजोगे साधन उपलब्ध झाल्याने नगर शहर व परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे याबाबतचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावेत, याबाबत मी स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले. 
यावेळी माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, ए.एन. शर्मा, रामेश्वर मिना, आर.के. बावडे, महेश सुपेकर, खलील मन्यार, नंदु लांडगे, महाळू शिपणकर, गौरव गव्हाळे, भाऊसाहेब चौधरी, संजय जरबंडी आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post