बोलेरो, स्काॅर्पिओसह महिंद्राच्या 'या' गाड्यांवर बंपर सूट

 बोलेरो, स्काॅर्पिओसह महिंद्राच्या 'या' गाड्यांवर बंपर सूटमुंबई: नवीन वर्षात नवी चार चाकी खरेदी करायची असेल तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बंपर सुट तुम्ही मिळवु शकता. काही कारवर कंपनी जबरदस्त डिस्काउंट देत आहे. या महिन्यात महिंद्रा कंपनी Mahindra Marazzo, Bolero, XUV500, KUV100 NXT, Scorpio आणि Alturas G4 वर मोठा डिस्काउंट ऑफर करीत आहे. 

Mahindra Alturas G4  या कारवर एकूण ३.०६ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात २.२० लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि ५० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. 

Mahindra KUV100 NXT वर ग्राहकांना ६२ हजार ५५ रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात ३८ हजार ५५ रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि २० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. याशिवाय, ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.

महिंद्रा बोलेरोवर ग्राहकांना एकूण २४ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. यात ३५०० हजारांचा कॅश डिस्काउंट आमि १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. याशिवाय यावर ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस  आहे.


Mahindra XUV500 2या गाडीवर ग्राहकांना एकूण ३९ हार ५०२ रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यात १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. 

Mahindra Scorpio 2या गाडीवर ग्राहकांना एकूण ३९ हार ५०२ रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यात १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post