ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून 'या' नेत्याकडे नगरची जबाबदारी, राम शिंदे यांच्यावर 'या' जिल्ह्याची जबाबदारी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे बडे नेते मैदानात उतरणार, नगर जिल्ह्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे, राम शिंदे यांना नाशिकची जबाबदारीमुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.  महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. यासाठी पक्षाने काही पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर आणि वर्धा


पंकजा मुंडे- बीड


चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर आणि भंडारा


गिरीष महाजन- जळगाव आणि अहमदनगर


आशिष शेलार - ठाणे


रविंद्र चव्हाण - सिंधुदुर्ग


रावसाहेब दानवे पाटील - नांदेड


संजय कुटे- अकोला आणि अमरावती


सुरेश हाळवणकर - सांगली आणि पुणे


सुभाष देशमुख - कोल्हापूर


प्रसाद लाड - रत्नागिरी उत्तर-दक्षिण


प्रविण दरेकर- रायगड उत्तर-दक्षिण


विनोद तावडे - पालघर


गिरीष बापट - सातारा


संजयबाळा भेगडे- सोलापूर


संभाजी पाटील निलंगेकर- लातूर आणि उस्मानाबाद


प्रीतम मुंडे - परभणी


बबनराव लोणीकर - हिंगोली


डॉ.भागवत कराड - जालना


जयकुमार रावल- धुळे


प्रा.देवयानी फरांदे-नंदुरबार


प्रा.राम शिंदे - नाशिक


चैनसुख संचेती - यवतमाळ


रणजीत पाटील - वाशिम


डॉ.अनिल बोंडे - बुलढाणा


अनिल सोले- गोंदिया


हरिभाऊ बागडे -औरंगाबाद


डॉ.रामदास आंबटकर - गडचिरोली


.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post