वाढदिवस विशेष....सर्वसामान्यांचे नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर

 वाढदिवस विशेष....सर्वसामान्यांचे नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकरकोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनमताला आपलेसं करून सर्वसामान्यांचे नेते म्हणून समाजकारण, राजकारण करणारे माजी आ.दादाभाऊ कळमकर हे संवेदनशील राजकारणी म्हणून परिचित आहेत. राजकारणात दुर्मिळ होत चाललेले वैचारिक अधिष्ठान कायम जपत त्यांनी समाजकारण केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अतिशय विश्वासू म्हणून नगर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून दिग्गजांच्या नगर जिल्ह्यात त्यांनी स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण करून 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करणारा विशेष लेख....


पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक सारख्या एका खेडेगावातील तरुण शिक्षणासाठी नगरला जातो. शिक्षणाबरोबरच एका छोट्या कॅन्टीनच्या द्वारे व्यवसाय सुरू करतो. व्यवसाय करता करता एसटीसी शिक्षण पूर्ण करून अहमदनगर शहराच्या राजकारणामध्ये सहभागी होतो. अहमदनगर दक्षिणचा आमदार होतो. हे निश्चितच खूप मोठं कौतुकास्पद व अभिनंदनीय असं कार्य आहे. पुढे शिक्षण, समाजकारण, राजकारण, व्यवसाय यामध्ये यशस्वी होतात. आमदार दादासाहेब कळमकर हे निश्चितच एक मोठे कौतुकास्पद व चांगले व्यक्तिमत्त्व आहे. दादांच्या आईने दादांना घडविले, कुटुंबाला घडविले. आदरणीय दादांना चांगले आरोग्य लाभो. खूप मोठे आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना व त्यांच्या 76 व्या जन्मदिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.  

-ऍड. महिपती काळे, न्हावरे, 9890560313


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post