मोठा निर्णय....'या' आंतरराष्ट्रीय संग्रहालयास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

 

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार

२६ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्यानातील भारतीय सफारीचे होणार उद्घाटनमुंबई, दि. 19 : नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली .

नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान  साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा  उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारित असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी भारतीय सफारीचे उद्घाटन

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरणसुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन  झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाईन तिकीट बुकींग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post