सोनिया गांधी, मायावती यांना'भारतरत्न'ने सन्मानित करावं

 

सोनिया गांधी, मायावती यांना'भारतरत्न'ने सन्मानित करावं



उत्तराखंड : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं, असं मत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी व्यक्त केलं आहे.

रावत म्हणाले, "काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाला किंवा नसाल. मात्र, सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. आज त्यांना भारतीय महिलांचं गौरवशाली स्वरुप मानलं जातं. त्याचबरोबर मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा या वर्षीचा भारतरत्न देऊन सन्मान करावा"

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post