पाणी चोर तुपाशी नागरिक मात्र उपाशी ! अनाधिकृत नळ कनेक्शन त्वरित काढा

 पाणी चोर तुपाशी नागरिक मात्र उपाशी !

अनाधिकृत नळ कनेक्शन त्वरित काढा



प्रभाग 2 मधील नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी

     नगर - नगर - औरंगाबाद रोडवरील वसंतनगररेणुकानगरतवलेनगरअभियंता कॉलनीसूर्यनगरएस.टी.कॉलनीहिंमतनगरलक्ष्मीनगर भागात पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीवर कमर्शियल  घरगुती नळ कनेक्शन अनाधिकृतपणे घेतल्याने प्रभाग 2 मधील उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असूनबर्याच भागात पाणीच येत नाहीपाणी चोर तुपाशी  नागरिक मात्र उपाशी अशीच परिस्थिती सध्या आहे.

     याबाबत नागरिकांनी प्रभाग 2 च्या नगरसेवकांना माहिती दिली असूनमाजी नगरसेवक निखिल वारेनगरसेवक सुनिल त्र्यंबकेविनित पाउलबुधेबाळासाहेब पवार आदिंनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता आर.जी.सातपुते यांची नागरिकांसमवेत बैठक घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

     यावेळी एकनाथ खिलारीनानासाहेब दातीरसूर्यकांत झेंडेवसंत सरमानेप्रसाद कदम,  प्रसाद कराळे यांनी चर्चेत भाग घेऊन लक्ष्मीनगरसह उपनगरातील पाणी प्रश् हा मुख्य जलवाहिनीवरील अनाधिकृत नळ कनेक्शनमुळे निर्माण झाला असूनतातडीने ही कनेक्शन काढाआठ दिवसात जर कनेक्शन काढली नाही तर रस्तारोको आंदोलन करावे लागेलअसा इशारा दिला आहे.

     निवेदनाच्या प्रती मनपा आयुक्तजिल्हाधिकारी यांच्यासह नगरसेवकांना दिल्याअभियंता आर.जी.सातपुते यांनी याबाबत तातउीने पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलेमाजी नगरसेवक निखिल वारे यांनी मनपाने नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन त्वरित दखल घ्यावीअन्यथा नागरिकांबरोबर आम्हाला देखील तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेलप्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणार्या लोकांना पाणी मिळालेच पाहिजेपाणी चोरांवर कठोर कारवाई साठी मनपाने पावले उचलावीअसेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post