कॉंग्रेसचे माजी मंत्री ‌विलासकाका पाटील उंडाळकर याचं निधन

 कॉंग्रेसचे माजी मंत्री ‌विलासकाका पाटील उंडाळकर याचं निधनसातारा : काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले माजी मंत्री विलासकाका उंडाळकर याचं अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षे वयाचे होते. त्यांनी सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आज दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी 12 वर्षे विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळून महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला. उंडाळकर यांचे सहकारी क्षेत्रातही मोठे काम आहे. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहाकरी संस्था उभारल्या. त्यांच्या जाण्याने कराड, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post