निलेश राणे यांच्यावर भाजपने सोपवली 'ही' जबाबदारी

निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती  • मुंबई - खा.नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या नियुक्तीचे पत्र राणे यांना दिले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा.राणे उपस्थित होते. निवडणुकीत नारायण राणे कुटुंबाने मोठी ताकद लावून सिंधुदुर्गात भाजपला मोठा विजय मिळवून दिला आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेवर मात केल्यानंतर लगेच निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post