अजितदादा, भाषा नीट वापरा..नाही तर घमेंड उतरवेल

 


अजितदादा, भाषा नीट वापरा..नाही तर घमेंड उतरवेल

निलेश राणे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा“अजित पवार साहेब, तुमची भाषा नीट करा, नाहीतर एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला. निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा शब्दात अजित पवारांनी निलेश राणेंवर हल्लाबोल चढवला होता. “फार कमी नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांना अनेक वर्ष मंत्रिपदं मिळाली, तरी पण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवार यांचं नाव घ्यावं लागेल. अजित पवार साहेब, भाषा नीट करा तुमची, नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा निलेश राणेंनी ट्विटरवरुन दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post